Pulses Rate : सणासुदीच्या काळात डाळी महाग होण्याची शक्यता, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
डाळींच्या वाढत्या किमती लक्षात घेता, केंद्र सरकारने तूर आणि उडीद डाळींचा साठा मर्यादा 30 ऑक्टोबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे.(Image Source : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्र सरकारने स्टॉक होल्डिंग युनिट्ससाठी स्टॉक होल्डिंग मर्यादा कमी करून बदल जाहीर केले आहेत.(Image Source : istock)
गेल्या वर्षभरात तूर डाळीचे भाव सर्वाधिक वाढले 27 टक्क्यांनी वाढले आहेत, त्यामुळे इतर डाळींच्या दरातही वाढ झाली आहे. आता पुन्हा एकदा सणासुदीच्या काळात डाळी आणखी महागण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी केंद्र सरकार विविध पाऊलं उचलत आहे. (Image Source : istock)
तूर आणि उडीद डाळ बाजारात माफक किमतीत ग्राहकांना डाळींची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने साठवणूक मर्यादा कमी करण्याचा आणि कालावधी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. (Image Source : istock)
सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, घाऊक विक्रेते आणि मोठ्या साखळी किरकोळ विक्रेत्यांसाठी साठा ठेवण्याची मर्यादा 200 मेट्रिक टनांवरून 50 मेट्रिक टनांपर्यंत कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. (Image Source : istock)
सरकारने नव्याने जारी केलेल्या आदेशानुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी तूर आणि उडीद डाळीची साठा मर्यादा 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. (Image Source : istock)
आता घाऊक विक्रेते 50 मेट्रिक टन, किरकोळ विक्रेते 5 मेट्रिक टन आणि मोठे साखळी विक्रेते 50 मेट्रिक टन डाळ डेपोत ठेवू शकतात.(Image Source : istock)
मिलर्ससाठी स्टॉक ठेवण्याची मर्यादा सध्याच्या 3 महिन्यांच्या उत्पादनाऐवजी 1 महिन्याच्या उत्पादनाच्या किंवा वार्षिक उत्पादन क्षमतेच्या 10 टक्के किंवा वार्षिक उत्पादन क्षमतेच्या 25 टक्के करण्यात आली आहे.(Image Source : istock)
सरकारच्या नव्या आदेशानुसार, डाळी आयात करणारे आयातदार कस्टम क्लिअरन्सच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा जास्त काळ डाळींचा साठा त्यांच्याकडे ठेवू शकत नाहीत. (Image Source : istock)
व्यापारी किंवा आयातदारांकडे असलेला साठा मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्यांना तो 30 दिवसांच्या कमी करावा लागेल.(Image Source : fittify)