Shimla Tourism: शिमल्यात पर्यटकांची रेलचेल, पाहा फोटो
शिमल्याचे रिज ग्राउंड आणि मॉल रोड दिवसभर पर्यटकांनी गजबजले होते. सायंकाळच्या सुमारासही पर्यटक आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासह शिमल्याच्या थंडीचा आनंद लुटताना दिसले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोक त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात शिमल्याची सुंदर छायाचित्रे टिपताना दिसत होते. शनिवारनंतर रविवारीही बाजारात अशीच गर्दी होण्याची शक्यता आहे.
पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे शिमल्याच्या रस्त्यांवरही वाहतूक कोंडी दिसून आली. पर्यटकांची संख्या वाढल्याने शहरातील पर्यटन व्यावसायिकांचे चेहरेही उजळले आहेत.
हिमाचल प्रदेशातील विविध पर्यटन स्थळांवर 15 डिसेंबरनंतर पर्यटन हंगामाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.
15 डिसेंबरचे आगाऊ बुकिंग पर्यटन व्यवसायिकांनी आधीच सुरू केले आहे.
हिमाचल प्रदेशात 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षीही शिमल्यात नववर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते.
हिमाचल प्रदेशच्या जीडीपीमध्ये पर्यटन व्यवसायाचा वाटा 7.6 टक्के आहे. राज्यातील लाखो लोकांचा रोजगार पर्यटन व्यवसायाशी निगडीत आहे.
जुलै-ऑगस्ट महिन्यातील आपत्तीनंतर राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या ओघात घट झाली होती, मात्र आता पर्यटन व्यवसाय पुन्हा रुळावर आला आहे.