PM Modi In Tejas: आकाशही ठेंगणं! पंतप्रधान मोदींनी फायटर विमान तेजसमधून भरले अवकाशात उड्डाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजसमधून अवकाशात उड्डाण केले. बेंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ला भेट दिल्यानंतर त्यांनी तेजसमधून हे उड्डाण केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतेजसमधून केलेल्या उड्डाणानंतर नरेंद्र मोदी यांनी भारतीय वायुसेना, DRDO आणि HAL तसेच सर्व भारतीयांचे अभिनंदन केले.
तेजस हे स्वदेशी हलके लढाऊ विमान आहे जे कोणत्याही हवामानात उडू शकते. हे दोन पायलट असलेले लढाऊ विमान आहे. त्याला लिफ्ट म्हणजेच लीड-इन फायटर ट्रेनर म्हणतात.
त्याला ग्राउंड अटॅक एअरक्राफ्ट असेही म्हणतात. म्हणजे गरज भासल्यास त्याच्या सहाय्याने हल्लाही केला जाऊ शकतो.
भारताचे स्वदेशी लढाऊ विमान तेजस जगभरात प्रसिद्ध आहे. हलके लढाऊ विमान तेजस खरेदी करण्यात अनेक देशांनी स्वारस्य दाखवले आहे. संरक्षण उत्पादनांच्या स्वदेशी उत्पादनावर मोदी सरकार सातत्याने भर देत आहे.
अमेरिका संरक्षण क्षेत्रातील दिग्गज जीई एरोस्पेसने पंतप्रधानांच्या यूएस दौऱ्यादरम्यान एमके-2-तेजससाठी संयुक्तपणे इंजिन तयार करण्यासाठी एचएएलसोबत करार केला होता.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या वर्षी एप्रिलमध्ये सांगितले होते की, 2022-2023 या आर्थिक वर्षात भारताच्या संरक्षण निर्यातीने 15,920 कोटी रुपयांचा उच्चांक गाठला आहे.
हवाई दलाने एचएएलला 123 तेजस विमानांची ऑर्डर दिली असून त्यापैकी 26 विमाने देण्यात आली आहेत. हे सर्व तेजस मार्क-1 आहेत.