Kerala Blast : केरळच्या एर्नाकुलममध्ये साखळी स्फोट; मुंबई, पुण्यात अलर्ट!
केरळच्या (Kerala News) एर्नाकुलममध्ये एकापाठोपाठ एक असे साखळी स्फोट (Kerala Blast Updates) झाले आहेत. (Photo : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्फोटांमध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळते. (Photo : PTI)
सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती आहे. रविवारी सकाळी एकापाठोपाठ तीन बॉम्बस्फोटांनी केरळ हादरलं. (Photo : PTI)
केरळमधील एर्नाकुलम येथे एका ख्रिश्चन प्रार्थना सभेत तीन स्फोट झाले आणि एकच गोंधळ उडाला (Photo : PTI)
स्फोटात आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. (Photo : PTI)
केरळमधील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे स्फोट झाले. (Photo : PTI)
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना घटनास्थळावर स्फोटात वापरलेल्या तारा, बॅटरी आणि इतर संशयास्पद वस्तुही सापडल्या आहेत. (Photo : PTI)
हा बॉम्ब टिफिन बॉक्समध्ये ठेवल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. (Photo : PTI)
कन्व्हेन्शन सेंटरमधील तीन दिवसीय कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. (Photo : PTI)
एकापाठोपाठ झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी केरळ हादरलं. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Photo : PTI)
केरळमध्ये आज सकाळी झालेल्या स्फोटानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करत आहेत. सर्व महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवण्यात आली आहे. कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पूर्णपणे काळजी घेण्यात आलेली आहे. (Photo : PTI)