Gyanvapi Masjid ASI Survey : ज्ञानवापीच्या तळघरात आणखी काय सापडलं?
वाराणसीमधील (Varanasi) ज्ञानव्यापी मशिद (Gyanvapi Masjid) परिसरात सध्या पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होतं. ज्ञानव्यापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) तळघराचा सर्व्हे करण्यात येत आहे.
ज्ञानव्यापी मशिदीमध्ये मंदिर शैलीतील 20 कपाटं सापडल्याचा दावा करण्यात येत आहे.
हिंदू पक्षाच्या वकिलांनी शनिवारी दावा केला होता की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India) विभागाला सर्वेक्षणादरम्यान मूर्तीचे अवशेष आणि काही तुटलेल्या कलाकृती सापडल्या आहेत.
दरम्यान, ASI कडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) तिसऱ्या दिवशी ज्ञानवापीच्या तीनही घुमट आणि परिसराचे सर्वेक्षण केलं
घुमटांच्या सर्वेक्षणादरम्यान पुरातत्व विभागाला गोलाकार छतामध्ये अनेक डिझाइन आढळले. यामध्ये मंदिर शैलीतील 20 हून अधिक अलमिरा म्हणजेच भिंतीत बांधलेली कपाटं सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात येत आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (ASI) ज्ञानव्यापीची रचना आणि भिंतीचं थ्री-डी मॅपिंग करण्यात आलं. दुसरीकडे, मुस्लिम पक्षाने इशारा दिला आहे की, जर मशिदीत हिंदू धर्मासंबंधित कलाकृती किंवा चिन्हं सापडल्याची अफवा पसरवली गेली तर ते संपूर्ण सर्वेक्षणावर बहिष्कार टाकतील.