सलग दोन पराभव, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सरकार स्थापन करु शकेल?
लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जनमत चाचणी करण्यात आली. या सर्वेक्षणात काँग्रेसचा पुन्हा एकदा पराभव होण्याची शक्यता वर्तवली आहे मात्र पक्षाच्या जागांमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविरोधकांच्या इंडिया या आघाडीच्या स्थापनेनंतर आणि राहुल गांधी यांना लोकसभेचं सदस्यत्व बहाल करण्यापूर्वी इंडिया टीव्ही-सीएनएक्सने हे सर्वेक्षण केलं, ज्याचे अंदाज धक्कादायक आहेत.
सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढण्याचा अंदाज आहे. तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए तिसऱ्यांदा बहुमतासह सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे.
सर्वेक्षणानुसार NDA ला लोकसभेच्या 543 पैकी 318 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेससह विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीला 175 जागा मिळू शकतात. याशिवाय इतरांना 50 जागा मिळण्याची शक्यता आहे.
मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत, INDIA आघाडीला 25 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. इतरांना 33 टक्के मते मिळू शकतात. तर एकट्या भाजपला 45 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला स्वबळावर 66 जागा मिळू शकतात तर भाजपला 290 जागा मिळण्याचा अंदाज सर्वेक्षणाच वर्तवला आहे. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढण्याची शक्यता आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 52 जागा मिळाल्या होत्या, तर 2014 मध्ये पक्षाला केवळ 44 जागा मिळाल्या होत्या. सर्वेक्षणानुसार 2024 मध्ये काँग्रेसच्या 14 जागा वाढण्याची शक्यता आहे.
काँग्रेसची यूपीए आघाडी आणि सध्याच्या आघाडीची आकडेवारी एकत्र केली तर 2019 मध्ये 91 जागा मिळाल्या होत्या. त्यानुसार INDIA आघाडीला 2024 मध्ये 175 जागा मिळाल्या तर 84 जागांचा फायदा होऊ शकतो.
दरम्यान राहुल गांधी यांना 7 ऑगस्ट रोजी लोकसभेचं सदस्यत्व बहाल करण्यात आलं आहे. त्यामुळे सदस्यत्व बहाल केल्याने आकडेवारीत फरक दिसू शकतो.