Security Breach in Lok Sabha: नव्या संसदेच्या सुरक्षेत मोठी कुचराई, दोन तरुणांच्या दर्शक गॅलरीतून थेट सभागृहात उड्या, धुराच्या नळकांड्या पेटवल्या
Security Breach in Lok Sabha: संसदेच्या सुरक्षेत मोठी कुचराई केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेच्या कामकाजादरम्यान एका तरुणानं सभागृहात प्रवेश केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभेत आज सुरक्षेत मोठी चूक दिसून आली. दोन जणांनी संसदेत घुसखोरी केली. लोकसभा सुरू असताना दोन जण लोकसभेत घुसले.
प्रेक्षक गॅलरीतून या दोघांनी खाली लोकसभेत उड्या मारल्या. लोकसभेत त्यांनी लक्ष वेधून घेण्यासाठी स्मोक कँडल्स जाळल्या.
दोघांना तातडीने मार्शल्सनी ताब्यात घेतलं. मात्र त्याआधी या दोघांच्या घुसखोरीमुळे लोकसभेत चांगलाच गोंधळ निर्माण झाला.
संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला बावीस वर्षे पूर्ण होत असतानाच आज ही घुसखोरी झाल्यामुळे संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित झालंय. एकूण चार तरूण होते.
दोघांनी लोकसभेत घुसखोरी केली तर दोघांनी संसदेच्या बाहेर निदर्शनं करत घोषणाबाजी केली.
संसदेच्या बाहेर घोषणाबाजी करणाऱ्या दोघांमध्ये महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाचा समावेश आहे.
संसदेच्या बाहेर घोषणाबाजी करणारा आणि स्मोक कँडल जाळणाऱ्यात एका महिलेचा समावेश आहे. ही महिला हरयाणातल्या हिस्सारची रहिवासी आहे.
तीन तरूणांपैकी एक जण लातूरचा अमोल धनराज शिंदे असल्याची माहिती समोर आलीय. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या चौघांनीही म्हैसूरच्या खासदारामार्फत पासेस बनवले होते अशी माहिती उघड झाली आहे.