Species of parties : 'या' पक्ष्यांच्या प्रजाती होणार नष्ट?
भारतात विविध पातळ्यांवरील पक्षी संवर्धनाच्या प्रयत्नांना यश येत असूनही काही पक्षांच्या प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशराल हंसक : हा पक्षी सध्या क्वचितच आढळून येतो. कारण ते राहत असलेल्या परिसराचा विनाश झाल्यामुळे फक्त मध्य व उत्तर अंधमानात ते आढळतात.
सुवर्णगरुड : बलुचिस्थान, वायव्या,सरहद्द प्रांत,पूर्वेकडे आसाम व नेपाळ या प्रदेशांतील पर्वतीय भागात सुवर्णगरुड आढळून येतो हा पक्षी दुर्मिळ होण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या निवासासाथानाचे संरक्षण व संवर्धन
कुल कोंगा: हा पक्षी अंदमान-निकोबार बेटांवर आढळून येतो.पुळणीनजीकच्या घनदाट जंगलातील झुडपात हा दिसून येतो. ही प्रजातीही दुर्मिळ होताना दिसत आहे.
कुलक्रौंच : मध्यप्रदेश,महाराष्ट्र,दक्षिणेकडे आंध्रप्रदेश,या प्रदेशांतील शेतीचे सपाट क्षेत्र आणि नदीकाठच्या भागात क्रौंच आढळतो.
सैबेरीअन क्रौंच: सैबेरीअन क्रौंच पक्षांची निवासस्थाने म्हणजे झिलानी व दलदली ही आहेत.उत्तरोत्तर ही क्षेत्रे अनेक कारणांनी नष्ट होत आहेत त्यामुळे हे पक्षी देखील नाहीसे होत चालले आहेत.
कुल माळढोक : काश्मीर,सिंध,हरियाना,उत्तर प्रदेश,या भागातील गवती कुरणे व शेतीच्या क्षेत्रात हे पक्षी आढळून येतात. यांना हिवाळी पाहुणे म्हणून देखील ओळखल्या जाते.
या पक्षांच्या प्रजाती वाचवण्यासाठी त्यांच्या योग्य नोंदी करणे आणि त्यांच्या निवासस्थानाचे संरक्षण , संवर्धन करणे आवश्यक आहे