बिहारच्या राजधानीत सांगली जिल्ह्यातील गलाई बांधवांचा मराठमोळा गणेशोत्सव
बिहारच्या राजधानीत सांगली जिल्ह्यातील गलाई बांधवांचा मराठमोळा गणेशोत्सव... पटना येथे ५० वर्षापासूनची गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त बिहारच्या पटना शहरात स्थायिक झालेल्या सांगली व सातारा जिल्ह्यातील मराठी लोकांनी महाराष्टपासून हजारो मैल दूर राहून मराठी अस्मिता जोपासली आहे.
सन १९७२ पासून येथील मराठी बांधवांकडून मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा केला जातोय.
बिहारची राजधानी असलेल्या पटना शहरात यावर्षी मराठी बांधव सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सव साजरा करीत असून या उत्सवाला मराठी साज चढविण्यात आला आहे
बिहारच्या पटना शहरात सांगली व सातारा जिल्ह्यातील मराठी बांधव सोने-चांदीचा गलाई व्यवसाय करीत आहेत. महाराष्टपासून हजारो मैल दूर असले तरी महाराष्टची संस्कृती, परंपरा व अस्मिता त्यांनी कायम जपली आहे.
सन १९७२ पासून येथे गणेशोत्सव साजरा केला जातो.
पटना येथील महाराष्टमंडळाच्या पदाधिकायांसह सचिव संजय भोसले यांच्या मागदर्शनाखाली सन २०१४ पासून लालबागच्या राजाची मूर्ती मुंबईहून आणून पटना येथे मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.
गणेशोत्सवाच्या सात दिवसांच्या कालखंडात या ठिकाणी हळदी-कुंकु, मुलांसाठी विविध स्पर्धा घेतली जातेच शिवाय बिहारमध्ये प्रशासकीय विविध पदावर कार्यरत असलेल्या मराठी अधिकायांचाही मंडळाच्यावतीने महाराष्टयीन फेटा बांधून सत्कार केला जातो.
बिहारमध्ये राहून मुंबईच्या लालबागच्या राजाचे दर्शन मराठी बांधवांना घेता येत नव्हते.