PHOTO : नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटणार; फोटो होतायत व्हायरल
नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचं रुपडं लवकरच पालटणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेल्वे मंत्रालयानं नव्या दिल्ली रेल्वे स्थानकाचे फोटो शेअर केले आहेत.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या मॉडेलची छायाचित्रं आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करताना रेल्वे मंत्रालयानं लिहिलं आहे की, नवीन युगाची सुरुवात, नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी प्रस्तावित डिझाइन.
रेल्वे स्थानकाच्या नव्या रचनेसोबतच जागतिक दर्जाच्या सुविधाही प्रवाशांना दिल्या जातील, असं सांगितलं जात आहे. मात्र, त्या सुविधा काय असतील, हे अद्याप कळू शकलेलं नाही.
या मॉडेलच्या निर्मितीनंतर दिल्ली रेल्वे स्थानक हे भारतातील सर्वात मोठं आणि आधुनिक स्थानक बनेल.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या या डिझाइनवर वर्षाच्या अखेरीस काम सुरू होऊ शकतं.
या मॉडेलचं काम रेल्वे भूविकास प्राधिकरणाकडे सोपवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकल्पाला पीपीपीएसीकडून लवकरच मंजुरी मिळू शकते.
रेल्वे स्थानकावर बहुस्तरीय पार्किंगची सुविधा असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पार्किंग पूर्णपणे स्वयंचलित असेल.
रेल्वे मंत्रालयानं भावनगर रेल्वे स्थानकाचा जुना आणि नवीन फोटो शेअर केला आहे. हे छायाचित्र शेअर करत रेल्वे मंत्रालयानं 'न्यू इंडिया, नवीन रेल्वे स्टेशन्स' असं लिहिलं आहे.