Republic Day Parade : प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील संचलनात भारताच्या सामर्थ्याचे दर्शन; पाहा खास क्षणचित्रे

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिल्लीतील संचलनात सहभागी झालेले कलाकार, या कलाकारांनी संचलनात लोककला सादर केली.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कर्नाटक राज्याचा चित्ररथ
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचा हा लक्ष वेधून घेणारा चित्ररथ
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पथकाने कर्तव्य पथवरील संचलनात सहभाग घेतला.
विविध निमलष्करी दलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला जवानांनी चित्ररथासह संचलन केले.
सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) उंटावर बसलेल्या तुकडीने 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभाग घेतला.
भारतीय लष्कराच्या K 9 Vajra-T (SP) या रणगाड्यांनीदेखील संचलन सोहळ्यात सहभाग घेतला.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात भारताच्या विविध लोकसंस्कृतीचे दर्शन घडले.
इजिप्तच्या सैन्य दलाच्या तुकडीने यंदा संचलनात सहभाग घेतला. कर्नल महमूद मोहम्मद अब्देल फताह एल खरासावी यांच्या नेतृत्वाखाली इजिप्शियन सशस्त्र दलांची तुकडी सहभागी झाली. इजिप्शियन सशस्त्र दलाच्या मुख्य शाखांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या तुकडीत 144 सैनिक होते.
हम तयार है: भारतीय नौदलाच्या चित्ररथाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
भारतीय जवानांनी यावेळी थरारक कसरती सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 या विमानांनी आकाशात थरारक प्रात्याक्षिके दाखवली.
भारतीय हवाई दलाच्या चित्ररथाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.