Republic Day 2023 India 26 January | प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास पेहराव!
पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज (26 जानेवारी) 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2023) भारताच्या विविधतेचे प्रतीक असलेली बहुरंगी राजस्थानी (Rajasthan) पगडी परिधान केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रजासत्ताक दिनाच्या परेडपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नॅशनल वॉर मेमोरियल (National War Memorial) येथे गेले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या पगडीनं अनेकांचे लक्ष वेधले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) खास पेहराव करतात. नरेंद्र मोदी अनेक वेळा विशिष्ट प्रदेशाचा पारंपारिक पोषाख परिधान करतात.
यंदा 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी बहुरंगी राजस्थानी पगडी, क्रिम कलरचा कुर्ता, ब्लॅक जॅकेट, पांढऱ्या रंगाचा स्टोल आणि काळे शूज असा पेहराव केला.
स्वातंत्र्य दिन (Independence Day) आणि प्रजासत्ताक दिननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी खास पेहराव करतात. गेल्या वर्षी, प्रजासत्ताक दिनानिमित्त पीएम मोदींनी केलेल्या पोशाखात उत्तराखंड आणि मणिपूरच्या संस्कृतीची झलक दिसत होती.
उत्तराखंडची ब्रह्मकमळ टोपी आणि मणिपूरचे लीरम फी स्टोल त्यांनी परिधान केली होती. मोदींच्या या पेहरावानं देखील अनेकांचे लक्ष वेधले.
2021 मध्ये 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल रंगाची टोपी घातली होती. ही टोपी जामनगरच्या शाही राजघराण्यानं नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून दिली होती.
2020 मध्ये पीएम मोदींनी भगवी बंधेज टोपी परिधान केली होती.
आपल्या देशात प्रत्येक धर्मात सण साजरे करण्याची परंपरा आहे. परंतू, काही सण असे आहेत जे प्रत्येक देशवासीयांसाठी महत्त्वाचे आहेत.
ते देशभर आदराने आणि आपुलकीने साजरे केले जातात. 26 जानेवारी हा देखील असाच एक सण आहे.