Republic Day 2024 : देशभरात इमारतींवर आकर्षक रोषणाई!
आज 75 वा प्रजासत्ताक दिन आहे. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रजासत्ताक दिन हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून देशभर साजरा केला जातो. (Photo Credit : PTI)
आजच्या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली.आजच्या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. (Photo Credit : PTI)
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात इमारतींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. (Photo Credit : PTI)
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. (Photo Credit : PTI)
26 जानेवारी हा प्रत्येक देशवासीयांसाठी महत्त्वाचा आहे. जो देशाचा राष्ट्रीय सण आहे. (Photo Credit : PTI)
देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा किंवा पंथाचा असो, हा दिवस संपूर्ण देशभक्तीने साजरा करतो. (Photo Credit : PTI)
26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. तत्पूर्वी, 26 जानेवारी 1930 रोजी देशात प्रथमच पूर्ण स्वराज दिन किंवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. (Photo Credit : PTI)
पुढील 18 वर्षे या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला, त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 हा दिवस अधिकृतपणे स्वातंत्र्यदिन म्हणून घोषित करण्यात आला. (Photo Credit : PTI)
संविधान सभेने 1950 मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली. (Photo Credit : PTI)