Arun Yogiraj: अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं तेजस्वी रूप घडवणारे अरुण योगीराज!
अयोध्येतील राम मंदिराचे दि.22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.(छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामललाच्या मूर्तीचा अयोध्येत उभारलेल्या भव्य राम मंदिरात अभिषेक करण्यात आला. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)
प्रभू श्रीरामाची मूर्ती घडवण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रातून तीन शिल्पकारांची निवड करण्यात आली. अरुण योगीराज हे या शिल्पकारांपैकी एक होते. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)
कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिला येथे ही मूर्ती तयार केली आहे.अरुण यांनी यापूर्वी अनेक रेखीव मूर्ती आणि शिल्प साकारली आहेत. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)
शिल्पकार अरुण योगीराज हे कर्नाटकातील म्हैसूर शहरातील रहिवासी आहेत. अरुण योगीराज यांना शिल्पकलेचा वारसा त्यांच्या कुटुंबातूनच मिळाला आहे, ते प्रसिद्ध शिल्पकारांच्या कुटुंबातून येतात. त्यांच्या पाच पिढ्या रेखीव मूर्त्या घडवण्याचं काम करतात. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)
अरुण योगीराज हे देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकारांपैकी एक आहेत. देशातील विविध राज्यांमध्ये अरुण यांनी घडवलेल्या कोरीव आणि रेखीव मूर्तींना मोठी मागणी आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुण यांच्या कौशल्याचं कौतुक केलं आहे. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)
आपल्या कौशल्याचा वापर करून अरुण योगीराज यांनी अनेक शिल्प तयार केली आहेत. आता अयोध्येतील भव्य राम मंदिरात विराजमान झालेल्या प्रभू श्रीरामाची मूर्ती घडवण्याचं भाग्यही लाभलं. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)
अरुण योगीराज यांनी 2008 मध्ये म्हैसूर विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं.त्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली. लहानपणापासूनच त्यांच्यावर शिल्पकलेचे संस्कार झाले आहेत. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)
प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी सुभाषचंद्र बोस यांचा 30 फूट उंचीचा पुतळा घडवला होता. पंतप्रधान मोदींच्या हस्ते इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती स्थळाच्या मागे भव्य छत्रीखाली हा पुतळा उभारण्यात आला होता. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)
पंतप्रधान मोदींनी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवला, तेव्हा त्यांनी शिल्पकार अरुण योगीराज यांचंही कौतुक केलं होतं. याशिवाय अरुण योगीराज यांनी केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांची 12 फूट उंचीची मूर्तीही घडवली होती, तेव्हापासूनच खरंतर अरुण योगीराज प्रसिद्धीझोतात आले. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)