Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Republic Day 2023 | देशभर 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
आज देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन (Happy Republic Day 2023) ... देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर देशाच्या संस्कृती आणि सामर्थ्याचं दर्शन झालं.
आज सकाळी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीद जवानांना वंदन करून पंतप्रधान कर्तव्य पथावर दाखल झाले तिथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.
आजच्या कार्यक्रमाला इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसि हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर झालेल्या शानदार सोहळ्यात भारताच्या सामरिक शक्तीचं दर्शन संपूर्ण जगाला झालंय लष्कर, नौदल, वायूदल. यासोबत निमलष्करीदल, पोलीस, डीआरडीओसारख्या संस्था विविध मंत्रालयांचे राज्यांचे चित्ररथ या माध्यमातून भारताची ताकद आणि सांस्कृतिक वारसा उपस्थितांनी आणि संपूर्ण जगानं पाहिला.
कर्तव्यपथावर पहिल्यांदाच इजिप्तच्या सशस्त्र दलाकडून संचलन करण्यात आले. कर्नल महमूद मोहम्मद अब्देल फताह अल खरासावी यांच्या नेतृत्वात इजिप्शियन सशस्त्र दलांची एकत्रित बँड आणि मार्चिंग तुकडीने परेडमध्ये सहभागी झाली. या तुकडीत 144 सैनिक होते. पहिल्यांदाच इजिप्तच्या नेत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमंत्रित करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात भारतीय संस्कृती आणि कलेचं दर्शन झाले. देशातील सर्व राज्यातील कलाकारांकडून कर्तव्यपथावर कलेचं सादरीकरण करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनी तिरंग्याला प्रथमच स्वदेशी तोफांमधून 21 तोफांची सलामी देण्यात आली आहे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी परेडची कमान सांभाळली. दरवर्षीप्रमाणे राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला.
कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता, वणीची सप्तश्रृंगी या शक्तिपीठांचे दर्शन आज दिल्लीतील पथसंलनात झालं.
विशेष आकर्षण असलेल्या अयोध्येच्या दिपोत्सवाचं सादरीकरण उत्तरप्रदेशच्या चित्ररथावर करण्यात आलं होतं. हरियाणाच्या चित्ररथावर कुरुक्षेत्रावरील अर्जून आणि कृष्णाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. भगवद्गीतेत सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून देशवासीयांना दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाचा प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात साजरा करीत असल्याने मोदींनी ट्वीट करत संदेश दिला आहे.