India 74th Republic Day : अंबाबाईच्या नावानं उदो उदो, कर्तव्यपथावर राज्यातील ‘साडेतीन शक्तिपीठे', पाहा गोंधळींचे खास फोटो!
देशभरात आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'साडेतीन शक्तिपीठं आणि स्त्रीशक्ती जागर' या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारण्यात आला
संचलनात यंदा राज्यातील ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ यांचं दर्शन झाले
प्रजासत्ताक दिनाला महाराष्ट्राचा चित्ररथ कसा असणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता होती.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठं आणि नारीशक्ती ही यावेळची थीम आहे.
चित्ररथाच्या समोर गोंधळी होते.
गोंधळींचं जे प्रमुख वाद्य आहे संबळ हे या ठिकाणी दाखवलेलं आहे.
कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तीपीठांचा देखावा दाखवण्यात आला आहे.
ही सगळी शक्तीपिठं म्हणजे नारीशक्तीचा सन्मान आहे. पोतराजसुद्धा चित्ररथाच्या मध्यभागी आहेत.
महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या देखाव्यावरील संपूर्ण शिल्प यवतमाळ जिल्ह्यात तयार करण्यात आले आहे पाटणबोरी येथील यशवंत एकनाथ येणगुटीवार यांनी तयार केली आहेत.