Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
RBI Governor Reaction on 2000 Rupees Notes: 'सावकाश बदला दोन हजारांच्या नोटा', नक्की असं का म्हटलं आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी?
दोन हजारांच्या नोट बंद झाल्यानंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काळजी करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं म्हटलं आहे. तसेच तुम्ही आरामात या नोटा बदलू शकता असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं की, 'नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी दिला आहे त्यामुळे तुम्ही सावकाश नोट बदलू शकता.'
आरबीआयने म्हटलं की, 'दोन हजारांच्या नोटा चलनात आणण्याचं उद्दिष्ट पूर्ण झालं आहे.'
नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा अवधी दिला आहे. त्यामुळे हा चार महिन्यांचा कालावधी लोकांनी गांभीर्याने घ्यावा असं देखील दास म्हणाले आहेत.
शक्तिकांत दास यांनी म्हटले की, 'या नोटा बदलणे हे क्लिन नोट पॉलिसीचा भाग होता.'
आरबीआयचे गव्हर्नर दास यांच्या मते हा व्यवस्थापनाचा भाग आहे.
तसेच दास यांनी म्हटलं आहे की, 'नोटा बदलण्यासाठी बराच कालावधी दिला आहे, त्यामुळे यासाठी कोणतीही अफरा-तफर करु नये.'
तसेच कोणतीही अडचण आल्यास आरबीआय त्यावर उपाय काढण्याचा पूर्ण प्रयत्न करेल असं आश्वासन देखील दास यांनी दिलं आहे.