Bengaluru Rain: बंगळुरू, कर्नाटकात वादळी वाऱ्यासह पाऊस; तरुणीचा मृत्यू
बेंगळुरूमध्ये आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे मोठे हाल झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसामुळे एका महिलेचा मृत्यू झाला तर एक लहान मुल बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.
बेंगळुरू शहरातील मुसळधार पावसाने अंडरपासमध्ये पाणी साचले होते. यामध्ये एक कार पाण्यात बुडाली. या कारमध्ये 6 जण होते.
या घटनेबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कुटुंबाप्रती शोक व्यक्त करत नुकसानभरपाई जाहीर केली आहे.
कार बुडाल्यानंतर कुटुंबीयांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्यांची सुटका करत रुग्णालयात दाखल केले.
कारमधील एका महिलेचा रुग्णालयात पोहोचल्यानंतर मृत्यू झाला. भानू रेखा असे या महिलेचे नाव आहे.
एक लहान मुलही बेपत्ता झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील 6 लोक हैदराबादहून बंगळुरूला आले होते, मात्र रविवारी (21 मे) दुपारी मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे ते येथे अडकले.
मुख्यमंत्र्यंनी हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनी यावेळी सांगितले की, कुटुंबाबद्दल सहानुभूती आहे आणि भानू रेखाच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल. यासोबतच त्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांवर मोफत उपचार करण्याचे आश्वासन दिले आहे.
मृत तरुणी भानूरेखाला रुग्णालयात आणले तेव्हा ती जीवित होती आणि तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
साडी आणि दोरीच्या मदतीने बचाव मोहीम पीडित हे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आहेत. या कुटुंबाने कार भाड्याने घेत बेंगळुरूला भेट दिली होती.
मुसळधार पावसामुळे अंडरपासवरील बॅरिकेड खाली पडले आणि ड्रायव्हरने अंडरपास ओलांडण्याची जोखीम पत्करली. अंडरपासमधील पाण्याची पातळी लक्षात न घेता कार चालकाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या मध्यभागी कार आल्यानंतर जवळपास पाण्यात बुडाली.