Photo : अपघाताने राजकारणात आलेल्या Rajiv Gandhi यांनी देशाच्या विकासाची दिशा बदलली
देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान आणि डिजिटल क्रांतीचे जनक समजल्या जाणाऱ्या राजीव गांधींची आज जन्मतिथी साजरी केली जात आहे. (photo by getty images)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईत झाला. राजीव गांधींच्या आजींच्या नावावरुन त्यांचं नाव राजीव असं ठेवण्यात आलं. (photo by getty images)
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचे नातू आणि इंदिरा गांधी यांचे पुत्र असलेल्या राजीव गांधींनी ब्रिटनमध्ये आपले शिक्षण पूर्ण केलं. 1966 साली ते पायलट बनले. (photo by getty images)
राजकारणात यायची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. पण संजय गांधींच्या अपघाती मृत्यूनंतर, 1980 साली त्यांना नाईलाजास्तव राजकारणात यावं लागलं. (photo by getty images)
1984 साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते देशाचे पंतप्रधान बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 1984 साली लोकसभेच्या तीन-चतुर्थांश जागा जिंकल्या. राजीव गांधींनी वयाच्या 40 व्या वर्षी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. (photo by getty images)
राजीव गांधींनी 1984 ते 1989 या काळात पंतप्रधान म्हणून घेतलेल्या निर्णयामुळे आजच्या भारताच्या विकासाची पायाभरणी झाल्याचं दिसून येतंय. (photo by getty images)
राजीव गांधींनी प्रौढ मताधिकारीची वयोमर्यादा 21 वर्षावरुन 18 वर आणली आणि लोकशाहीच्या प्रक्रियेत अधिक युवकांना सामिल करुन घेतलं. (photo by getty images)
21 मे 1991 रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तामिळनाडूत लिट्टे या श्रीलंकेतील दहशतवादी गटाने मानवी बॉम्बचा वापर करत राजीव गांधी यांची हत्या केली. परंतु पंतप्रधान म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे भारताच्या विकासावर दूरगामी परिणाम झाले आहेत. (photo by getty images)