Rajinikanth: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत, आशिर्वाद देण्यासाठी आले रजनीकांत
नुकतचं कन्नड चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार अभिषेक अंबरीश आणि उद्योजिका अवीवा बिदापा हे दोघेही विवाहबद्ध झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया जोडप्यांच्या विवाहासोहळ्यात सुपस्टार रजनीकांत यांचीही उपस्थिती होती.
अभिनेता अभिषेक अंबरीशच्या विवाहामध्ये शुभेच्छा देण्यासाठी साऊथ सुपरस्टार अभिनेता यशही हजर होता. यशने गळाभेट घेत या जोडप्यांना शुभेच्छा दिल्या.
या विवाह सोहळ्यासाठी सिनेक्षेत्र आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी पोहोचले होते.
याआधी अभिषेक आणि अवीवा यांच्या साखरपुड्याचे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
अभिषेक अंबरीश हे कन्नड चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार अंबरीश यांचे पुत्र आहेत. अभिषेक यांच्या वडिलांना रिबेल स्टारच्या नावानं ओळखलं जातं.
अभिषेक अंबरीश यांची आईसुद्धा एक अभिनेत्री म्हणून एक काळ गाजवला आहे.
अवीवा बिदापा उद्योजिक असण्यासोबत मॉडलिंगही करते.
सध्या अभिनेता अभिषेक अंबरीश आणि अवीवा बिदापा यांच्या जोडीला सोशल मीडियावर प्रचंड पसंद करण्यात येत आहे.