Rain : उत्तर भारतात पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत
सध्या उत्तर भारतात पावसानं (Rain) हाहाकार केला आहे. मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखडं, दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. त्यामुळं नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे.
हिमाचल प्रदेशमधील मनालीमध्ये अनेक पर्यटक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
मुसळधार पावसामुळं उत्तर भारतात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
आजपासून हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये पाऊस कमी होईल. दुसरीकडे, ईशान्य भारत आणि सिक्कीममध्ये खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे.
13 जुलैपर्यंत बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे आणि त्यानंतर पाऊस कमी होण्याची शक्यता
हिमाचल प्रदेशमधील परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करुन मदत मागितली होती. परंतू, अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. सुमारे 4000 कोटींचे नुकसान झाले असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिली.
दिल्लीत यमुना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यमुनेचे पाणी 206.32 मीटरच्या वर गेले आहे
यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने सखल भागात पुराचा धोकाही वाढला आहे. धोक्याची भीती लक्षात घेऊन लोकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.