In Pics : तामिळनाडूच्या पामबन ब्रिजची सुंदर छायाचित्रं, पाहण्यासाठी येथे क्लिक करा
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज बहुचर्चित आशा पामबन ब्रिजची काही Exclusive छायाचित्रं आपल्या ट्विटर अकाउंटवर प्रसिद्ध केली. Photo: @AshwiniVaishnaw
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील मंडपम आणि रामेश्वराम या दोन गावांना जोडणारा पुल 1914 साली सुरु झाला होता.
1964 साली रामेश्वरम चक्रीवादळात या पुलाचे नुकसान देखील झाले होते व नंतर 2018 साली पुलाच्या काही भागात पुन्हा तडे गेल्याने तो बंद करण्यात आला होता. त्तकालीन रेल्व मंत्री पीयूष गोयल यांनी नव्या पुलाची घोषणा करत बांधकामासाठी 250 कोटी जाहीर केले होते.
या पुलाची लांबी 2.5 किलोमिटर असेल व हा देशातील पहिला 'व्हर्टीकल लिफ्ट सी-ब्रिज' असेल. जुन्या पुलाचा तुलनेत नवा पूल तीन मीटर उंच असेल व समुद्राहुन 22 मिटर उंचीवर असेल. Photo: @AshwiniVaishnaw
पुलाचा 63-मीटरचा मध्यभाग हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वर उचलता येणार आहे जेणेकरून जहाजांना त्याखालून सहजपणे जाता येईल. रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीला पुलाच्या कामचं कंत्राट देण्यात आलं आहे. Photo: @AshwiniVaishnaw
सध्या पुलाचं काम जोरदार सुरू असून मार्च २०२० नंतर सामान्य जनतेसाठी खुला करण्याची शक्यता आहे. नवीन होणारा पामबन पुल हा विस्मयकारक इंजिनियरिंगचा एक अद्भुत नमुना आहे. रामेश्वरम व धनुषकोडी आधीच नामांकीत पर्यटन स्थळं आहेत आणि या भव्य-दिव्य पुलामुळे तामिळनाडूच्या पर्यटनाला अजून गती मिळण्याची शक्यता आहे. Photo: @AshwiniVaishnaw