Bharat Gaurav Tourist Train : भारत गौरव ट्रेनने 8 ज्योतिर्लिंगांचं दर्शन, IRCTC चं स्वस्त टूर पॅकेज
भारतीय रेल्वे वेळोवेळी विविध प्रकारचे टूर पॅकेज आणते. आज 'भारत गौरव ट्रेन' शिर्डी आणि ज्योतिर्लिंग टूर पॅकेजबद्दल जाणून घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIRCTC विविध प्रकारचे धार्मिक टूर पॅकेज घेऊन येत असते. भारत गौरव ट्रेनने तुम्ही शिर्डी आणि ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊ शकता.
हे पॅकेज बिहारमधील कटिहार स्टेशनपासून सुरू होईल. भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने प्रवास केल्यास तुम्हाला 8 ज्योतिर्लिंग आणि शिर्डीत दर्शन घेतला येईल.
यामध्ये तुम्हाला ओंकारेश्वर, महाकालेश्वर, सोमनाथ, द्वारकाधीश मंदिर, नागेश्वर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग पाहायला मिळेल.
याशिवाय तुम्हाला शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाचीही संधी मिळणार आहे. हे पॅकेज 13 दिवस आणि 12 रात्रींचं आहे.
हे टूर 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून 7 डिसेंबरपर्यंत चालेल. या पॅकेजची इकोनॉमी आणि स्टॅडर्ड अशा दोन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्री जेवणाची सुविधा मिळेल.
तसेच एसी किंवा नॉन एसी रूममध्ये आणि रात्रीच्या मुक्कामासाठी सोयही असेल.
या पॅकेजमध्ये, तुम्हाला इकोनॉमी (Economy) क्लासने प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्तीसाठी 21,251 रुपये खर्च करावे लागतील.
तसेच स्टॅडर्ड (Standard) क्लासने प्रवासासाठी प्रति व्यक्ती 33,251 रुपये द्यावे लागतील.