Opposition Parties Meeting: राहुल गांधी, ममता बॅनर्जी की शरद पवार; विरोधी पक्षांच्या नेत्यांपैकी सर्वात श्रीमंत कोण?
विरोधकांच्या महाबैठकीत राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासह 26 विरोधी पक्षनेते सहभागी होणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभेचं सदस्यत्व गमावलेल्या राहुल गांधी यांच्या नेट वर्थबद्दल बोलायचं झालं तर 2019 च्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण संपत्ती 16 कोटी आहे. गुरुग्राममध्ये 8 कोटींच्या मालमत्तेशिवाय राहुल गांधींकडे अनेक आलिशान गाड्याही आहेत.
राहुल गांधींना गाड्यांची खूप आवड आहे आणि ते अनेकदा टाटा सफारी, टोयोटा लँड क्रूझर यांसारख्या गाड्यांमधून प्रवास करताना दिसतात.
एकेकाळी आयआयटीचे इंजिनिअर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची एकूण संपत्ती सुमारे 4 कोटी आहे. साधेपणाची आवड असलेले मुख्यमंत्री केजरीवाल यांचे घर असलेल्या 'शीश महल'च्या नूतनीकरणासाठी 52 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी भाजपकडून करण्यात आला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वाहानांची फारशी आवड नाही, त्यांच्याकडे मर्सिडीज आणि व्होल्वो या दोनच गाड्या आहेत.
ऑल इंडिया तृणमूलच्या अहवालानुसार, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (TMC) नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची एकूण संपत्ती सुमारे 18 लाख आहे. त्यांच्या नावावर ना स्वतःचं घर आहे, ना कार.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना महिन्याला किमान 8000 रुपये पगार मिळतो, पण 2011 पासून आतापर्यंत त्यांनी क्लेम केलेला नाही. ममता बॅनर्जी एक लेखिका आणि संगीतकार आहेत आणि त्यांची अनेक पुस्तकं बेस्ट सेलर देखील आहेत.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची एकूण संपत्ती 40.02 कोटी असल्याचं निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केलं होतं. त्यांनी शेती, पगार, सार्वजनिक हित आणि भाडं हे त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत असल्याचं सांगितलं आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची संपत्ती 5.86 कोटी आहे. क्रिकेटमध्ये रस असलेल्या तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार, त्यांनी दिल्लीच्या न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये 4 लाखांचं घर घेतलं होतं, ज्याची बाजारातील किंमत आता 150 कोटींवर गेली आहे. तेजस्वी यादव भारताच्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत स्टँडबाय खेळाडू म्हणून खेळले होते.
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव शरद पवार. त्यांची राजकीय कारकीर्द 63 वर्षांची आहे. ते एकूण 32.73 कोटींच्या मालमत्तेचे मालक आहेत.