संपूर्ण दिल्ली जलमय झाल्यास, दृश्य कसं असेल? AI नं दाखवलं भविष्यातलं वास्तव, फोटो पाहुन धक्का बसेल
AI फोटोंमध्ये जर भविष्यात संपूर्ण दिल्लीत पाणी भरलं, तर दिल्लीकर कसे प्रवास करतीय याचं भीषण वास्तव दर्शवलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाच्या इतर जिल्ह्यांसह राजधानी दिल्लीही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा सामना करत आहे.
अनेक शहरांमध्ये पूरस्थिती उद्भवली आहे. दिल्लीतही गेल्या काही दिवसांपासून अशीच परिस्थिती आहे.
हथिनीकुंड बॅरेजमधून पाणी सोडल्यामुळे यमुने नदीच्या पाण्याची पातळी एवढी वाढली की, गेल्या 45 वर्षांचा विक्रम मोडला गेला आणि संपूर्ण दिल्ली जलमय झाली.
दिल्लीत यमुना नदी धोक्याची पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीपेक्षा 3 मीटर वर वाहत होती. यावेळी यमुनेची पाण्याची पातळी विक्रमी 208.66 मीटरवर पोहोचली, त्यामुळे लाल किल्ल्यासह अनेक सखल भागांत पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, यमुना नदीची पाणी पातळी हळूहळू कमी होत असून दिल्लीत शिरलेल्या पाण्याचा स्तरही कमी झाला आहे.
दरम्यान, यमुना नदीची पाणी पातळी हळूहळू कमी होत असून दिल्लीत शिरलेल्या पाण्याचा स्तरही कमी झाला आहे.
इन्स्टाग्रामवर आर्टिस्ट विकास पवार @vkspwr ने काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये लाल किल्ला आणि इंडिया गेटसह इतरही अनेक भागांत पाणी भरल्याचं दिसून येत आहे.
पाणी भरल्यामुळे संपूर्ण दिल्लीतील रस्त्यांना नदी-नाल्यांचं स्वरुप प्राप्त झालं आहे. तर दिल्लीतील लोक प्रवास करण्यासाठी गाड्यांऐवजी बोट आणि पाणबुड्यांचा वापर करत असल्याचं पाहायला मिळत आहे.