Project Cheetah : दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात दाखल, थोड्याच वेळात कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडणार
नामीबियामधून (Namibia) आणखी 12 चित्ते आज भारतात दाखल झाले आहेत. याआधी आठ चित्ते भारतात आणण्यात आले होते. (PC:ANI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदक्षिण आफ्रिकेतून (South Africa) शुक्रवारी रवाना झालेले चित्तेत आज मध्य प्रदेशातील ग्वालियर विमानतळावर दाखल झाले आहेत. तेथून त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी याबाबत माहिती देत सांगितलं आहे की, यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
ही दक्षिण आफ्रिकेतील चित्त्यांची भारतात येणारी दुसरी खेप आहे. याआधी आठ चित्ते भारतात आणण्यात आले आहेत.
भारतीय हवाई दलाच्या C17 विमानामधून 12 चित्ते भारतात पोहोचले आहेत. हे विमान मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरला पोहोचलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वात भारत सरकारकडून 'प्रोजेक्ट चित्ता' (Project Cheetah) मिशन राबवलं जात आहे.
12 चित्त्यांपैकी सात नर आणि पाच मादी आहेत. या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहे.
भारतातील चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने भारतासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. या अंतर्गत केंद्र सरकार प्रोजेक्ट चित्ता राबवत आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या 12 चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येणार आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना आधी क्वारंटाईनमध्ये ठेवलं जाईल.
भारतातून 1952 मध्ये चित्ता नामशेष झाला. त्यानंतर आता भारतातील चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकारची ही मोहीम आहे.