Shimla: प्रियांका गांधी शिमल्यातील आपत्तीग्रस्त कुटुंबांच्या भेटीला; केंद्राकडे मदतीचं आवाहन, पाहा फोटो
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा हिमाचलच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी त्यांनी कुल्लू, मनाली आणि मंडी येथील पूरग्रस्त भागांना भेट दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा हिमाचलच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी त्यांनी कुल्लू, मनाली आणि मंडी येथील पूरग्रस्त भागांना भेट दिली.
14 ऑगस्ट रोजी या मंदिर परिसरात भूस्खलन झालं होतं, ज्यामध्ये सुमारे 20 लोकांचा मृत्यू झाला होता.
प्रियंका गांधी यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.
यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या, यावेळच्या पावसाने हिमाचलमध्ये मोठं नुकसान केलं आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने हिमाचलमधील लोकांना मदत करावी.
केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती घोषित केल्यास हिमाचल प्रदेशला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो, असं प्रियंका म्हणाल्या.
हिमाचल प्रदेशातील आपत्तीने भयंकर विध्वंस केला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून लोक बेघर झाले आहेत, अशा वेळी प्रियांका गांधींनी पूरग्रस्त लोकांशी संवाद साधला.
हिमाचल सरकार आपल्या स्तरावर मदत आणि पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे की राज्याला केंद्राच्या मदतीची गरज आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.
यावेळी प्रियांका गांधींनी केंद्र सरकारला आवाहन केलं आहे की, केंद्राने हिमाचलची आपत्ती ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी, जेणेकरुन आपत्तीग्रस्त लोकांचं योग्य पुनर्वसन करता येईल.
काँग्रेस संसदेच्या विशेष अधिवेशनात हिमाचल प्रदेशला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याचा मुद्दा उपस्थित करणार आहे.
प्रियांका गांधींच्या भेटीमुळे शिमल्यातील नागरिकांना मदतीची आस लागली आणि काहीसा दिलासा देखील मिळाला.
काँग्रेसचे इतर खासदारही हिमाचल प्रदेशच्या हितासाठी आवाज उठवणार आहेत.