iPhone 15 pro आणि Pro Max चे जबराट फिचर्स पाहिले का? फोटोग्राफीसाठी क्लास! पाहा संपूर्ण लूक
नव्या प्रो आयफोन्समध्ये टेलिफोटो लेन्स, नवी A17 प्रो बायोनिक चिपसेट, यूएसबी C आणि ios 17 असे बदल देण्यात आले आहेत, तर त्याच्या स्पशेल लेन्समुळे हे दोन्ही फोन फोटोग्राफीसाठी खास तयार करण्यात आले आहेत. यात काढलेले फोटो देखील पाहूया, ज्यावरुन तु्म्हाला फोनचा एकूण अंदाज येईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppApple iPhone 15 Pro मध्ये 6.1 इंचाची डिस्प्ले स्क्रीन आहे, तर iPhone 15 Pro Max मध्ये 6.7 इंचांची मोठी डिस्प्ले स्क्रीन मिळते.
आयफोन 15 प्रोची किंमत 1,34,900 रुपयांपासून सुरु होईल. तर आयफोन 15 प्रो मॅक्सच्या बेस मॉडेलसाठी 1,59,900 रुपये मोजावे लागणार आहेत. हे दोन्ही फोन सप्टेंबरपासून प्री ऑर्डर करता येणार आहेत आणि यांची विक्री 22 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
आयफोन 15 प्रो आणि प्रो मॅक्स ब्लॅक टायटॅनियम, ब्लू टायटॅनियम, व्हाइट टायटॅनियम आणि नॅचरल टायटॅनियम अशा चार रंगांमध्ये लाँच करण्यात आले आहेत.
अॅपलचा iPhone 15 Pro आणि Pro Max टायटॅनियम डिझाइनसह लाँच करण्यात आला आहे. यात कस्टमाइज अॅक्शन बटण आणि नेक्स्ट जनरेशन पोर्ट्रेटची सुविधा असेल.
अॅपलने iPhone 15 pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये नवीन A17 Pro चिपसेट दिला आहे, जो गेमिंग अनुभवाला एक पाऊल पुढे नेतो. असा दावा केला जात आहे की, अॅपलचा नवीन A17 Pro चिपसेट जगातील सर्वात वेगवान चिपसेट आहे.
iPhone 15 Pro आणि Pro Max च्या कॅमेर्याबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांच्या मागील पॅनलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, फोटोग्राफीसाठी हा फोन खास आहे.
या फोनमध्ये 48MP मेन पोर्ट्रेट कॅमेरा (Portrait Camera) उपलब्ध असेल.
iPhone 15 Pro फोनमध्ये पोर्ट्रेट नाईट मोडमध्ये देखील उत्कृष्ट फोटो क्लिक करता येतात.
तर फोनमध्ये एक नवीन 24MP फोटोनिक कॅमेरा उपलब्ध असेल, जो खास कॅमेरा अनुभव देईल. तसेच, तिसऱ्या कॅमेरामध्ये 5X ऑप्टिकल झूमसह 12MP टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे.
दूरवरील फोटो देखील तुम्ही अगदी स्पष्ट काढू शकता. अगदी क्लियर फोटोसाठी हे दोन्ही फोन खास आहेत.
व्हिडीओसाठीही या फोनचे कॅमेरे खास आहेत. ते चांगली लो लाइट परफॉर्मन्स, स्टॅबिलायजेशन आणि डेप्थ ऑफ फिल्ड इफेक्ट देण्यास उपयुक्त ठरतात.
अगदी DSLR कॅमेऱ्याप्रमाणेच या दोन्ही आयफोनच्या लेन्स काम करतात.
हा आयफोन 15 प्रो मधून घेतलेला खास फोटो आहे, या फोटोमधून तुम्हाला कॅमेरा क्लियारिटी आणि अन्य गोष्टीचा अंदाज येईल.
नवीन iPhone 15 सिरीजमध्ये यूजर्सना चार्जिंगसाठी USB Type-C पोर्टचा सपोर्ट मिळेल. म्हणजेच लाइटनिंग पोर्ट फोनमधून काढून टाकण्यात आले आहे. हा पोर्ट आता बहुतेक नवीन Androids मध्ये देखील आढळतो.