International Yoga Day 2022 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांचं कर्नाटकात योगासन
आज जागतिक योग दिन. योगाचे शारीरिक आणि मानसिक महत्त्व पटवून देण्यासाठी आजचा हा दिन साजरा केला जातो. यंदाचं हे पाचवं वर्ष आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज, जगभरात योगाबद्दल जनजागृती करण्यासाठी 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकातील म्हैसूर पॅलेस मैदानावर योग कार्यक्रमात सहभागी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग कार्यक्रम म्हैसूर पॅलेस मैदानावर सकाळी 6.30 वाजता सुरू झाला. या दरम्यान पंतप्रधान मोदी योगा करताना दिसले.
कोरोना विषाणूच्या साथीमुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी हे म्हैसूरमध्ये योग करताना 8व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभासह स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे एकत्रीकरण करताना दिसले.
यावेळी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना सहभाग पाहायला मिळाला.