Assam Flood : आसाममध्ये 'आभाळ फाटलं'; जनजीवन विस्कळीत
देशाच्या उत्तर-पूर्व भागात संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत केलं आहे. त्यामुळे आसाममधील सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. (PHOTO Credit : Twitter)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयादरम्यान, भारतीय लष्कर, सीआरपीएफ (CRPF), बीएसएफ (BSF), एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफचे (SDRF) पथक सिलचरच्या शहरी आणि ग्रामीण भागांसह काछाड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांत बचाव कार्य करताना दिसलं.
अधिकृत माहितीनुसार, आसाममधील सिलचर शहर आणि काछाड (Cachar district) जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून गर्भवती महिला, मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसह 3,000 हून अधिक लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आहे.
आसाममधील कछाड जिल्ह्यात यापूर्वी संततधार पावसानं भूस्खलनाची घटना घडली होती. ज्यामध्ये गाडल्या गेल्याने दोघांचा मृत्यू झाला होता.
कामरूप ग्रामीणच्या पालेपारा गावात पुरामुळे 40 वर्षीय कर्करोगग्रस्त रुग्ण तीन दिवसांपासून अडकून पडला होता. ज्याची भारतीय लष्करानं सुटका करून गुवाहाटी येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं आहे.
सततच्या पावसामुळे आसाम (Assam), मेघालय (Meghalaya), अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) बहुतांश नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत.