Vindhyagiri: 'विंध्यगिरी' युद्धनौकेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जलावतरण, हुगळी नदीच्या किनारी जलावतरण संपन्न
नौदलासाठी बांधण्यात आलेल्या 'विंध्यगिरी' या अत्याधुनिक युद्धनौकेचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हुगळी नदीच्या किनारी जलावतरण करण्यात आलंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआकाश, जमीन आणि पाण्याखालून होणारे हल्ले निष्प्रभ करण्याची क्षमता या युद्धनौकेत आहे.
या वेगवान युद्धनौकेवर दिशादिग्दर्शित क्षेपणास्त्र आणि इतर अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आल्यात.
चाचण्यांनंतर ही युद्धनौका नौदलाकडे सुपूर्द करण्यात येईल.
या युद्धनौकेत ब्रह्मोस क्षेपणास्त्रही तैनात करण्यात आले आहे
या युद्धनौकेत दोन हेलिकॉप्टरही तैनात करता येणार आहे.
नव्या तंत्रज्ञानासह नवीन विंध्यगिरी नौदलाच्या ताफ्यात सामील होत आहे
ही यु्द्धनौका 488.10 फूट लांब असून, याचे बीम 58.7 फूट आहे
या युद्धनौकेचा कमाल वेग 59 किलोमीटर प्रतितास आहे.
यात एकाचवेळी 35 अधिकाऱ्यांसह 226 नौसैनिक तैनात होऊ शकतात.