Himachal Rain Update: हिमाचलमध्ये जलप्रलय! आतापर्यंत 81 बळी, बचावकार्य सुरुच; पाहा फोटो
मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असताना राज्यात ढगफुटी, घरं पडून आणि भूस्खलनामुळे 81 जणांचा मृत्यू झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appढिगाऱ्याखाली दबल्यामुळे आणि वाहून गेल्याने सुमारे 13 जण अद्यापही बेपत्ता आहेत.
पावसाने ग्रासलेल्या हिमाचल प्रदेशातील मृतांची संख्या 81 वर पोहोचली आहे.
हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त भागात अडकलेल्या रहिवाशांना वाचवण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या जवानांकडून बचाव कार्य सुरू आहे.
हवाई दलाचे हेलिकॉप्टर, लष्कराचे जवान आणि एनडीआरएफ यांच्या मदतीने पूरग्रस्त भागातील लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
कांगडा जिल्ह्यातील इंदोरा आणि फतेहपूर विभागातील पूरग्रस्त भागातून गेल्या 24 तासांत 1 हजार 731 जणांना वाचवण्यात आलं आहे, असं उपायुक्त निपुण जिंदाल यांनी बुधवारी सांगितलं.
पावसाच्या दुर्घटनांमध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.
भूस्खलन झालेल्या भागांनाही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली.
शिमल्यासह इतर जिल्ह्यांतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सुक्खु यांनी भेट दिली आणि कुटुंबीयांना आधार दिला.
मंडी जिल्ह्यात आणि राजधानी शिमल्यात मृतांचा आकडा सर्वाधिक आहे. शिमला, सोलन, कांगडा आणि मंडीमध्ये दोन ठिकाणी ढगफुटी झाली.
अनेक ठिकाणी घरं कोसळल्यामुळे जखमींना वाचवण्याचं आणि ढिगाऱ्यांखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरूच आहे.
भूस्खलनामुळे रेल्वे ट्रॅक देखील निखळून बाहेर आले आहेत.
सीएम सुक्खू यांनी सांगितलं की, मुसळधार पावसामुळे हिमाचलमध्ये खूप नुकसान झालं आहे. पायाभूत सुविधा सुरळीत होण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागेल, असंही ते म्हणाले.
संततधार पावसामुळे भूस्खलनाच्या भीतीने कृष्णा नगरमधील सुमारे 15 घरं रिकामी करण्यात आली असून कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे.
समर हिल आणि कृष्णा नगर भागात बचावकार्य सुरू आहे. सोमवारी कोसळलेल्या समर हिल येथील शिवमंदिराच्या ढिगाऱ्यात अजूनही काही मृतदेह गाडले गेल्याची भीती आहे.