Mahakumbh Stampede: महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि इतर प्रशासकीय युनिट्स घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की, 50-80 लोक जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डायवर्जन केलेल्या घाटांवर लोक जाऊ इच्छित नव्हते. सर्वांना संगमावरच स्नान करायचं होतं, त्यामुळे एकाच ठिकाणी ओव्हर क्राउडिंग झालं आणि मोठी चेंगराचेंगरी झाली.
जखमींना महाकुंभातील केंद्रीय रुग्णालयात आणलं जात आहे. आतापर्यंत किती लोक जखमी झाले आहेत, याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण अनेकजण जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संगम घाटाकडे कोणीही जाऊ नये, अशा जत्रेच्या परिसरात सतत अनाउन्समेंट केल्या जात आहेत. लोकांनी शक्य तितक्या लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा.
मौनी अमावस्येच्या शाही स्नानामुळे महाकुंभात 8-10 कोटी लोकांची गर्दी पोहोचली होती.
आता प्रश्न असा येतो की, ही घटना कशी घडली? यावर एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, ही दुर्घटना स्नान घाटावर घडली. ही घटना 1 वाजता घडली. गर्दी एवढी झाली की, लोक एकमेकांच्या अंगा-खांद्यावर चढले. काही लोकांनी माझी मदत केली आणि मग आम्ही वाचलो.