Pralay Missile : सीमेवर भारताचा नवा योद्धा 'प्रलय'! शत्रूला भरणार धडकी; केंद्राचं मोठं पाऊल
भारतीय संरक्षण मंत्रालयाने चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर प्रलय क्षेपणास्त्र तैनात करण्यास हिरवा दिला आहे. संरक्षण मंत्रालयाने 120 प्रलय क्षेपणास्त्रांच्या खरेदीला परवानगी दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतवांगमध्ये चिनी सैन्यासोबत भारतीय सैनिकांच्या हिंसक चकमकीच्या पार्श्वभूमीवर भारताला सीमा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठी पावले उचलण्यास भाग पाडले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता भारताकडून पाकिस्तान (Pakistan) आणि चीनच्या (China) सीमेवर ‘प्रलय’ हे शक्तिशाली बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे.
त्यामुळे भारताचे शत्रू मानले जाणारे चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना भारताकडे वाईट नजरेने पाहण्याचे धाडस होणार नाही. 'प्रलय' हे कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वेग सर्वाधिक मारक आहे.
प्रलय क्षेपणास्त्र चीन आणि पाकिस्तानच्या भारतीय सीमेवर तैनात केले जाईल. चीन आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकार सातत्याने आपली लष्करी ताकद वाढवत आहे.
प्रलय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या खरेदीला केंद्र सरकारकडून परवानगी मिळणे ही देशासाठी मोठी प्रगती मानली जात आहे. भारताकडे आता आव्हानात्मक भूमिकांमध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास परवानगी असणार आहे.
चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आहेत, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) विकसित केलेले क्षेपणास्त्र अधिक विकसित केले जात असून लष्कराला हवे असल्यास त्याची रेंज लक्षणीयरीत्या वाढवता येऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
चीनसोबतचा सीमावाद आणि पाकिस्तानसोबतचे तणावपूर्ण संबंध असताना केंद्र सरकारने प्रलय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र खरेदीचा मोठा निर्णय घेतला आहे.
चीनच्या आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकार LAC सीमेवरील भागात पायाभूत सुविधांचा विकास करत आहे. अलिकडेच भारताने अरुणाचल प्रदेशातील चीनचा घुसखोरीचा प्रयत्न उलटून लावला.
एकीकडून चीन सीमावर्ती भागात हालचाली कायम आहे. या पार्श्वभूमीवर भारत सीमेलगतच्या भागात पायाभूत सुविधा अधिक मजबूत करत आहे. सीमावर्ती भागात भारत सरकारकडून रस्ते आणि भूयारांचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
दरम्यान, भारत सरकारने सीमेवर पायाभूत सुविधांच्या उभारणीला गती दिली आहे. भारत सीमावर्ती भागात रस्ते बांधण्याचं काम वेगाने सुरु आहे.