Main Atal Hoon: रवी जाधव उलघडणार वाजपेयींचा जीवनप्रवास, पंकज त्रिपाठींची 'अटल' भूमिका
गेल्या काही दिवसांपासून 'मैं अटल हूँ' (Main Atal Hoon) या सिनेमामुळे चर्चेत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सिनेमात ते देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या भूमिकेत झळकणार आहेत.
आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकमधला पंकजचा फर्स्ट लूक आज आऊट झाला आहे.
राजकारणी, पंतप्रधान, कवी अशा अनेक बाजू या फोटोंच्या माध्यमातून उलगडण्यात आल्या आहेत.
'मैं अटल हूँ' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव सांभाळत आहेत.
त्यांनीदेखील सोशल मीडियावर पंकज त्रिपाठी यांची पहिली झलक शेअर केली आहे.
'मैं अटल हूँ' हा सिनेमा 'द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अॅण्ड पॅराडॉक्स' या पुस्तकावर आधारित आहे.
पुढील वर्षी डिसेंबरमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.