Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Police Custody : देशात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण पोलिसांच्या कारवाईमुळे किंवा अन्य कारणामुळे आरोपीचा कोठडीत मृत्यू झाल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल.
देशात दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांच्या पोलीस कोठडीत कैद्यांच्या मृत्यूची माहिती समोर येते. पण तुम्हाला माहित आहे का, देशातील कोणत्या राज्यात कोठडीदरम्यान सर्वाधिक मृत्यू होतात? याबाबत जाणून घेऊयात..
कैद्याला कोठडीत ठेवणे आणि त्याची चौकशी करणे ही कोणत्याही राज्यातील पोलिसांची कायदेशीर प्रक्रिया आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, अनेकवेळा आरोपींचा चौकशीदरम्यान मृत्यूही होतो.
उत्तर प्रदेशात पोलीस कोठडीत असलेल्या लोकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे.
यानंतर पश्चिम बंगालचे नाव दुसऱ्या क्रमांकावर येते, जिथे पोलीस कोठडीत आरोपींचा मृत्यू होतो.
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, 2020-21 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये 451 लोकांचा कोठडीत मृत्यू झाला, तर 2021-22 मध्ये हा आकडा 501 वर पोहोचला.
कोठडीतील मृत्यूंमध्ये पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2020-21 मध्ये 185 लोकांचा मृत्यू झाला, तर 2021-22 मध्ये 257 आरोपींचा मृत्यू झाला.
2020-21 मध्ये भारतात 1940 लोकांचा मृत्यू झाला, तर 2021-22 मध्ये हा आकडा वाढून 2544 झाला.