Kashmir: काश्मीरमध्ये चिल्लई कलान! पारा उणे 8.5 अंशांच्या खाली, गेल्या पाच दशकातील सर्वात थंड रात्रीची नोंद
तापमानात होणारी लक्षणीय घट,प्रचंड हिमवृष्टी, कडाक्याची थंडी. काश्मीर खोऱ्यातली गारठा भल्याभल्यांना भुरळ पाडणाराय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाश्मीर खोऱ्यात सध्या देशातील सर्वात कमी तापमानाची नोंद होतेय. 30 डिसेंबर 2024 रोजी खोऱ्यात तापमानात उणे 8.5 अंशांपर्यंत घसरण झाली, जी गेल्या पाच दशकांतील सर्वात थंड हिवाळ्याची रात्र होती.
तापमानाच्या या घसरणीला चिल्लई कलान असा शब्द आहे. हा काश्मीर खोऱ्यातला 40 दिवसांचा तीव्र थंडीचा काळ समजला जातो.
21 डिसेंबरपासून सुरु झालेला हा काळ जानेवारी 29 पर्यंत संपण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात जम्मू काश्मीर वगळता इतरत्र थंडीची लाट थोडी कमी झाली असली तरी काश्मीर खोऱ्यात मात्र हिमवृष्टीमुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.
विशेषत: गुलमर्ग आणि पहलगाममध्ये हा कडाका प्रचंड असून तापमानाचा पारा उणे ९.० अंशांपर्यत उतरला आहे.
दक्षिण काश्मीर गोठलेलेच असून पहलगाममध्ये किमान तापमान शुन्याखाली ८ .५ अंशावर आहे.
गुलमर्गच्या स्की रिसॉर्टमध्ये -10.0 डिग्री सेल्सियस, त्यानंतर सोनमर्ग -9.9 डिग्री सेल्सियस आणि पहलगाममध्ये -9.2 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. श्रीनगरमध्ये, किमान तापमान -0.9 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले
चिल्लई कलान दरम्यान लोक पारंपारिक 'फेरान' घालतात. हा एक लांब लोकरीचा झगा आहे जो तीव्र हिवाळ्यात उबदारपणा देतो.