एक्स्प्लोर
PHOTO : निळे जॅकेट परिधान केल्यामुळे मोदींचं कौतुक का होतंय?
PM Modi Jacket : पंतप्रधानांनी संसदेत घातलेलं निळ्या रंगाचे जॅकेट फार विशेष होतं. कारण हे जॅकेट कोणत्याही कापडापासून नाही तर प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करुन तयार केलेल्या धाग्यापासून बनवलं आहे
PM Modi Jacket
1/7

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणावर सरकारने मांडलेल्या आभार प्रस्तावावर पंतप्रधानांनी भाषण केलं. यादरम्यान त्यांनी निळ्या रंगाचे जॅकेट घातलेले होते जे फार विशेष होतं.
2/7

खरंतर हे जॅकेट परिधान करुन पंतप्रधान मोदींनी संसदेत संबोधित करताना प्लास्टिकपासून पर्यावरण वाचवण्याचा संदेशही दिला.
3/7

हे जॅकेट कोणत्याही कापडापासून बनवलेले नसून प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करुन तयार केलेल्या धाग्यापासून बनवले आहे.
4/7

हे जॅकेट दोन दिवसांपूर्वी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (IOC) पंतप्रधान मोदींना बंगळुरुमध्ये आयोजित इंडिया एनर्जी वीकमध्ये भेट दिलं होतं.
5/7

खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेलं जॅकेट असो वा सूट किंवा पगडी अथवा फेटा, त्यांचा पोशाख हा कायमच चर्चेचा विषय असतो. त्यातच आता त्यांनी संसदेत परिधान केलेल्या जॅकेटची भर पडली आहे.
6/7

पंतप्रधानांचे जॅकेट तयार करण्यासाठी सुमारे 15 प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे. तामिळनाडूतील श्री रंग पॉलिमर्स नावाच्या या कंपनीने पेट (Pet) बॉटलच्या पुनर्वापरातून बनवलेले 9 वेगवेगळ्या रंगांचे कपडे इंडियन ऑइलला पाठवले होते. त्यातून पीएम मोदींसाठी कपड्यांचा रंग निवडण्यात आला.
7/7

यानंतर हे कापड गुजरातमधील टेलरकडे पाठवण्यात आले, जो पंतप्रधान मोदींचे कपडे तयार करतो. त्या टेलरने या कपड्यातून नरेंद्र मोदींचं जॅकेट तयार केलं, जे नंतर पंतप्रधानांना सादर करण्यात आलं.
Published at : 09 Feb 2023 08:01 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र
भारत























