PM Modi in Tirupati : पंतप्रधानांचं तिरुपती बालाजीला साकडं! भगवान व्यंकटेश्वराच्या चरणी मोदी
पंतप्रधान मोदींचा कर्नाटक ते तेलंगणा व्हाया आंध्र प्रदेश... लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुपतीच्या दर्शनाला पोहोचले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुपती बालाजीकडून काय मागितलं, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
पंतप्रधान मोदींनी मंदिरात पूजा-अर्चाही केली. याचे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत X (Twitter) खात्यावरून शेअर करण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करून लिहिले, 'तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात 140 कोटी भारतीयांच्या उत्तम आरोग्य, आनंद आणि समृद्धीसाठी शुभेच्छा.'
तिरुमला दौऱ्यानंतर लवकरच पंतप्रधान तेलंगणात पुन्हा प्रचार करणार आहेत.
यानंतर पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये पोहोचणार आहे. तिथे पंतप्रधान मोदी दोन जाहीर सभा आणि मेगा रोड शो करणार आहेत.
तीन दिवसांच्या तेलंगणा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोदी हैदराबादमध्ये रोड शो करणार आहेत.
कोरोनानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुपती बालाजीच्या चरणी लीन झाले आहेत.
पंतप्रधान मोदींचा रोड शो दुपारी 4 वाजता सुरू होईल आणि आरटीसी क्रॉसरोडपासून सुरू होईल आणि काचेगुडा क्रॉसरोडपर्यंत जाईल. याआधी मोदी दुपारी 12 वाजता महबूबाबाद आणि दुपारी 2 वाजता करीमनगरमध्ये जाहीर सभांना संबोधित करतील.
पंतप्रधान मोदींचा रोड शो दुपारी 4 वाजता सुरू होईल आणि आरटीसी क्रॉसरोडपासून सुरू होईल आणि काचेगुडा क्रॉसरोडपर्यंत जाईल. याआधी मोदी दुपारी 12 वाजता महबूबाबाद आणि दुपारी 2 वाजता करीमनगरमध्ये जाहीर सभांना संबोधित करतील.
रविवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे पोहोचले, जेथे त्यांचे राज्यपाल एस अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी स्वागत केले. पंतप्रधान मोदी रात्री 8 वाजता तिरुपतीजवळील रेनिंगुट्टा विमानतळावर उतरले.