PM Modi Mann Ki Baat: मेड इन इंडिया ते प्रोजेक्ट सूरतपर्यंत 'मन की बात'मधील 10 महत्त्वाचे मुद्दे; जाणून घ्या
सर्वप्रथम पंतप्रधान मोदींनी जनसंवादाच्या सुरुवातीलाच शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 26 नोव्हेंबर हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनंतर पंतप्रधान मोदींनी सर्व देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 26 नोव्हेंबरचा दिवस एका कारणासाठी खास असल्याचं पीएम मोदींनी म्हटलं. या दिवशीच संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली असल्याचं ते म्हणाले.
भारतीय उत्पादने खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असल्याचं मोदी म्हणाले. गेल्या काही दिवसांत देशात दिवाळी, भाऊबीज आणि छठ या सणांच्या दिवशी 4 लाख कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाला आहे, असं मोदी म्हणाले.
परदेशात लग्न करण्यावर पंतप्रधानांनी प्रश्न उपस्थित केला. मोदी म्हणाले, आजकाल काही कुटुंबं परदेशात जाऊन लग्न करू लागली आहेत. त्यामुळे नवीन वातावरण तयार होत आहे. ते आवश्यक आहे का? जर आपण भारतीय भूमीवर, भारतातील लोकांमध्ये विवाह साजरे केले, तर देशाचा पैसा देशातच राहील.
आता घरातील मुलंही दुकानात काही खरेदी करताना त्यावर मेड इन इंडिया लिहिलेलं आहे की नाही हे तपासू लागले आहेत. हे 'व्होकल फॉर लोकल'चं यश असल्याचं मोदी म्हणाले.
पीएम मोदी म्हणाले की, हे दुसरे वर्ष आहे जेव्हा दिवाळीनिमित्त रोख पैसे देऊन काही वस्तू खरेदी करण्याचा ट्रेंड हळूहळू कमी होत आहे. याचा अर्थ आता लोक अधिकाधिक डिजिटल पेमेंट करत आहेत. हे देखील खूप उत्साहवर्धक आहे. भारतातील डिजिटल क्रांतीच्या यशामुळे हे पूर्णपणे शक्य झालं आहे, असं मोदी म्हणाले.
भारतात पेटंट अर्ज वाढले असल्याचंही मोदी म्हणाले. बुद्धिमत्ता, कल्पना आणि नाविन्य ही आज भारतीय तरुणांची ओळख बनली आहे. 2022 मध्ये भारतातील पेटंट अर्जांमध्ये 31 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, त्याबद्दल मोदींनी तरुणांचं अभिनंदन केलं आहे.
पीएम मोदी म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानाने स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत लोकांची विचारसरणी बदलली आहे. सुरतमधील एका टीमने मिळून प्रोजेक्ट सुरत सुरू केला आहे. याद्वारे सुरतला एक मॉडेल सिटी बनवलं जात आहे, जे स्वच्छतेचं आणि शाश्वत विकासाचं उदाहरण बनेल.
पंतप्रधान मोदींनी लडाखच्या पश्मिना शालचा देखील उल्लेख केला. पीएम मोदी म्हणाले, मला लडाखचं एक प्रेरणादायी उदाहरण तुम्हा सर्वांसोबत शेअर करायचं आहे. पश्मिना शालबद्दल तुम्हाला माहिती असेलच.
लद्दाखी पश्मीनाचीही गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा होत आहे. लडाखच्या लूम्सच्या नावाने लद्दाखी पश्मिना जगभरातील बाजारपेठेत पोहोचत आहे. 15 गावांमध्ये 450 हून अधिक महिला त्याची तयारी करत आहेत.