Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
In Pics : कुन्नूर हेलिकॉप्टर अपघातातील 13 जणांना पंतप्रधान मोदीकडून आदरांजली
तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात देशानं सीडीएस जनरल बिपीन रावत (BIPIN RAWAT) यांना गमावलं. बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा अपघातात मृत्यू झाला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुटुंबियांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आदरांजली अर्पण केली.
तिन्ही दलाच्या प्रमुखांनीही श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान उद्या 13 जणांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या पार्थिव देहावर शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
जनरल जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचं पार्थिव आज मिलिट्री विमानानं दिल्लीला आणलं जाणार आहे
शुक्रवारी जनरल रावत यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाईल. सकाळी 11 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाला सलामी देण्यासाठी ठेवलं जाईल.
दिल्लीच्या कॅन्टॉन्मेंटमधील ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहे.