CDS जनरल बिपीन रावत यांच्यासह देशाने गमावलेले 'हे' योद्धे
ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे संरक्षण सल्लागार म्हणून काम करत होते. दहशतवादविरोधी मोहिमेत त्यांचे विशेष योगदान होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग हे 11 गोरखा रायफल्सचे होते. त्यांनी सियाचीन ग्लेशियरवर तैनाती आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतील कार्यकाळासह विविध त्यांच्या बटालियनमधील मोहिमेत सहभाग घेतला.
विंग कमांडर पृथ्वीसिंह भारतीय हवाई दलाचे अनुभवी पायलट होते. सन 2000 मध्ये हवाई दलात सहभागी झाले होते.
पॅरा कमांडो असलेले लान्स नायक विवेककुमार हे सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे PSO म्हणून कार्यरत होते.
नाईक गुरुसेवक सिंह हे गरीब कुटुंबातील होते. भारतीय लष्करातील 9 पॅरा स्पेशल फोर्सचे ते जवान होते. सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे PSO होते.
नाईक जितेंद्र कुमार : भारतीय लष्कराच्या 3 PARA SF मध्ये जवान होते. नाईक जितेंद्र कुमारदेखील सीडीएस जनरल बिपीनकुमार यांचे PSO होते.
लान्स नायक बी. साई तेजा : मृतांमध्ये २७ वर्षीय लान्स नायक साई तेजा यांचाही समावेश असून साई तेजा हे आंध्र प्रदेशातील होते. लान्स नायक साई तेजा हेदेखील पॅरा फोर्सचे जवान होते.