PM Modi UAE Visit : जगातील सर्वात उंच इमारतीवर झळकला पंतप्रधान मोदींचा फोटो, बुर्ज खलिफावर खास संदेश; UAE मध्ये जोरदार स्वागत
दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यावरून पंतप्रधान आज सकाळी युएईमध्ये दाखल झाले. पंतप्रधान मोदी यांचं युएईमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी उजळून निघाली.
बुर्ज खलिफा इमारतीवर तिरंगा, पंतप्रधान मोदींचा फोटोसह स्वागतासाठी खास संदेश झळकला.
दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाली होती.
बुर्ज खलिफावर त्यांचा फोटोसह 'पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत आहे' असं लिहिलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या एक दिवसीय दौऱ्यावर आज अबुधाबी येथे पोहोचले आहेत.
युएई दौऱ्यावर पंतप्रधान मोदी युएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील आणि दोन्ही सामरिक भागीदारांमधील द्विपक्षीय संबंध दृढ करण्याचा आढावा घेतील.
पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यामुळे भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन देशांतील मैत्री, व्यापारी आणि धोरणात्मक संबंध अधिक दृढ होतील.
फ्रान्सचा दोन दिवसांचा दौरा संपवून मोदी अबुधाबीला पोहोचले आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह त्यांनी बॅस्टिल डे परेडला विशेष अतिथी म्हणून हजेरी लावली होती.
बुर्ज खलिफा इमारतीवर फक्त खास प्रसंगी आणि खास लोकांसाठी असे संदेश, वेलकम नोट्स किंवा ग्रीटिंग्ज झळकतात.
शनिवारी बुर्ज खलिफा इमारतीवर फोटो झळकवून पंतप्रधान मोदींचे यूएईमध्ये स्वागत करण्यात आले. आधी बुर्ज खलिफावर भारताचा राष्ट्रध्वज, नंतर पीएम मोदींचा फोटो आणि नंतर स्वागत चिठ्ठी फडकली.