Port Blair Airport : पोर्ट ब्लेअर विमानतळाचं उद्घाटन, 710 कोटी रुपयांचा खर्चून उभारलं नवं टर्मिनल
केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबारला जागतिक दर्जाच्या विमानतळाची भेट मिळणार आहे. यामुळे केंद्रशासित प्रदेशाचा संपर्क सुधारेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान मोदी मंगळवारी अंदमान-निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचं ऑनलाईन उद्घाटन करतील.
सुमारे 710 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले हे पोर्ट ब्लेअर टर्मिनल बेट केंद्रशासित प्रदेशावर कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. तसेच यामुळे स्थानिक लोकांसाठी रोजगारच्या नव्या संधीही निर्माण होतील.
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया सकाळी 9 वाजता विमानतळावर पोहोचतील, तर दीड तासानंतर पंतप्रधान मोदी टर्मिनल इमारतीचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 710 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे अंदमान आणि निकोबारमधील कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल.
या प्रकल्पात एकूण 40,800 चौरस मीटर क्षेत्रात बांधकाम केले जाणार आहे. नवीन टर्मिनल इमारतीतून दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष प्रवाशांना सुविधा पुरवली जाईल.
पोर्ट ब्लेअर विमानतळावर 80 कोटी रुपये खर्चून दोन बोईंग-767-400 आणि दोन एअरबस-321 प्रकारच्या विमानांसाठी उपयुक्त असलेले ऍप्रनही बांधण्यात आले आहेत.