Kedarnath : मोठी बातमी! केदारनाथ मंदिरात मोबाईल फोनवर बंदी; फोटो, रिल्स आणि व्हिडीओ काढण्यास मनाई
श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंदिर परिसरात मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली असून फोटो, व्हिडीओ आणि रिल्स बनवण्यावर बंदी (Ban) घातली आहे. (Image Source:PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियामुळे केदारनाथ लोकांच्या मनांत भिनलं आहे. प्रत्येकाला आयुष्यात किमान एकदा केदारनाथला जाण्याची इच्छा नक्कीच असते. (Image Source:PTI)
उत्तराखंडमधील केदारनाथ अनेक श्रद्धांळूंसाठी आस्थेचं स्थान आहे. पण, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी केदारनाथ व्ह्युज आणि लाईक्स मिळवण्याचं एक माध्यम बनलं आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने नवा आदेश जारी केला आहे.(Image Source:PTI)
पवित्र चार धामांमधील सर्वात लोकप्रिय असलेल्या केदारनाथमध्ये आता मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. येथे येणाऱ्या भाविकांना आता मंदिर परिसरात फोन वापरता येणार नाही. (Image Source:PTI)
काही दिवसापूर्वीच मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात रिल्स आणि व्हिडीओ बनवण्यास बंदी घातली होती. त्यानंतर आता मंदिर प्रशासनाने मोबाईल फोन संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.(Image Source:PTI)
केदारनाथ मंदिर समितीने मंदिर परिसरात फोन नेण्यावर बंदी घातली आहे. एवढंच नाही तर भाविकांना आता मंदिरात फोटो, रिल्स किंवा व्हिडीओही काढता येणार नाहीत.(Image Source:PTI)
यासोबतच मंदिर समितीने कपडे घालण्याबाबत नवीन नियम लागू केले आहेत. (Image Source:PTI)
काही दिवसांपूर्वा केदारनाथ मंदिर परिसरातील काही व्हिडीओ व्हायरल झाले होते, या व्हायरल व्हिडीओमुळे पावित्र्य भंग करत भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने आता मोबाईल फोनला मनाई केली आहे. (Image Source:PTI)
केदारनाथ मंदिरासमोर तरुणीने बॉयफ्रेंडला प्रपोज केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केदारनाथ मंदिर समितीने मंदिर परिसरात व्हिडीओ आणि रिल्स बनवण्यास मनाई केली होती.(Image Source:PTI)
यानंतर आधी मंदिर परिसरात व्हिडीओ आणि रिल्स बनवण्यावर बंदी घालण्यात आली. (Image Source:PTI)
त्यानंतर आता मंदिर प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत मोबाईल बंदी लागू केली आहे.(Image Source:PTI)