PM Modi in France : पंतप्रधान मोदींचे फ्रान्समध्ये स्वागत, दोन दिवस करणार फ्रान्सचा दौरा
फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच पंतप्रधान मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देखील देण्यात आले आहे.
दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची देखील भेट घेणार आहेत.
पंतप्रधान मोदी हे फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांच्यासोबत बैठक करणार आहेत.
फ्रान्समधील भारतीय समुदायाला संबोधित देखील ते करतील.
भारत आणि फ्रान्सच्या यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण समजला जात आहे.
पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा हा दौरा दोन्ही देशांच्या भविष्यासाठी नव्या दिशा ठरणार असेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांतील धोराणात्मक भागीदारीला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत.
पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रापती मॅक्रॉन येत्या काळातील आव्हानांवर चर्चा करतील.