Chandrayaan-3: मिशन चांद्रयान! भारत रचणार आणखी एक इतिहास; पाहा तयारीचे फोटो
चंद्रयान-3 लाँच होताच भारत हा चंद्रयान सोडणारा जगातील चौथा देश बननणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान मोदी यांच्या सपोर्टमुळे आणि त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या करारांमुळे हे शक्य होऊ शकलं, असं राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले.
चंद्रयान तीन हे चंद्रयान दोनचे फॉलोअप मिशन आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग आणि प्रदक्षिणा घालण्याची भारताची क्षमता प्रदर्शित करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे.
चंद्रावर लँड केल्यानंतर 6 पायांचा रोवर बाहेर येईल, जो 14 दिवस चंद्रावर काम करेल. रोवरकडे अनेक कॅमेरे आहेत ज्याच्या मदतीने वेगवेगळ्या अँगलने फोटो घेणं अगदी सहज शक्य होणार आहे.
राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, 'चांद्रयान-3 मोहिमेची प्राथमिक तीन उद्दिष्टं आहेत, चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंगचं प्रात्यक्षिक दाखवणं, चंद्रावरील रोव्हरचं फिरण्याचं प्रात्यक्षिक दाखवणं आणि जागेवरच वैज्ञानिक प्रयोग करणं'
चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाबाबत संपूर्ण देशात प्रचंड उत्साह आहे.
14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता चांद्रयान-3 प्रक्षेपित होणार आहे.
मागील चांद्रयान-2 मोहीम शेवटच्या टप्प्यात अयशस्वी झाली, त्याचा लँडर धक्क्याने पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळला, त्यानंतर त्याचा पृथ्वीच्या नियंत्रण कक्षेशी संपर्क तुटला.
यंदाच्या चांद्रयान मोहिमेकडून देशाला बऱ्याच आशा आहेत.