Tourism: केरळमधील 'ही' 10 सुंदर ठिकाणं तुमचं मन मोहून टाकतील; एकदा हे फोटो पाहाच
अलेप्पी बॅकवॉटर: केरळमधील अलेप्पीला 'पूर्वेकडील व्हेनिस' म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच व्हेनिसच्या सौंदर्याप्रमाणेच अलेप्पी देखील अतिशय सुंदर आणि पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. अलेप्पीचा समुद्र किनारा, तलाव आणि राहण्यासाठी हाऊसबोट खूप प्रसिद्ध आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोची: कोची (कोचीन), ज्याला ‘गेटवे टू केरळ’ देखील म्हणतात, हे केरळमधील सर्वोत्तम पर्यटन ठिकाण मानलं जातं. हे केरळमधील शहरांपैकी एक आहे. कोची हे सांस्कृतिक शहर आहे, तेथील वसाहती सौंदर्य आणि वारसा, युरोपियन वास्तुकला असलेलं जुने शहर फोर्ट कोची तुम्ही पाहू शकता. डच पॅलेस आणि चेराई बीच देखील भेट देण्यासारखे आहे.
मुन्नार: मुन्नार येथील उंचच उंच हिरवळीनं नटलेला डोंगर आणि ढगांना स्पर्श करतानाचं दृश्य मन मोहून टाकणारं आहे. नवविवाहित जोडप्यांसाठी हे अतिशय आकर्षणाचं ठिकाण मानलं जातं. चहा उत्पादनासाठी देखील मुन्नार प्रसिद्ध आहे. चहाच्या मळ्याचा सुगंध आणि निसर्गाचं देखणं रुप पाहण्यासाठी पर्यटक इथं येतात.
थेक्कडी: ट्रेकर्स, निसर्ग सौंदर्यप्रेमी, पशू प्रेमींसाठी केरळमधील थेक्कडी स्वर्गापेक्षा कमी नाही. फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी थेक्कडी अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथे विविध प्रकारचे पशुपक्षी आढळतात. थेक्कडी येथील ट्री हाऊस रिसॉर्टमध्ये राहून तुम्ही वन्यजीव आणि हिरवाईचा आनंद घेऊ शकता.
कुमारकोम: खारफुटीची जंगलं, हिरवी हिरवी भातशेती आणि नारळाच्या बागांनी हे ठिकाण भरलेलं आहे. ज्यांना बॅकवॉटर, निसर्ग, पक्षी, धबधबे, इतिहास आणि खाद्यपदार्थ आवडतात, त्यांच्यासाठी हे हिरवेगार नंदनवन आहे. हे केरळ राज्यातील सर्वात मोठे सरोवर, वेंबनाड तलावाजवळ आहे. हाऊसबोट राईड हे कुमारकोममधील मुख्य पर्यटक आकर्षण आहे.
वायनाड: वायनाड हे केरळमधील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक ठिकाण आहे. प्रदुषणमुक्त वायनाड हे पर्यटकांसाठी आकर्षणाचं ठिकाण ठरतं.
कोवलम: केरळची राजधानी तिरुअनंतपुरमपासून केवळ 16 किमी अंतरावर असलेलं कोवलम देखील समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. कोवलम येथील उंचच उंच नारळाची झाडं आणि मनमोहून टाकणारा समुद्रकिनारा आकर्षणाचं केंद्र ठरतो. कोवलमला दक्षिण भारतातील स्वर्ग म्हणून ओळखलं जातं.
पूवर बेट: या रोमँटिक गेटवेमध्ये सुंदर समुद्रकिनारे आहेत. राहण्यासाठी फ्लोटिंग कॉटेज आहेत. घनदाट खारफुटीच्या जंगलातून बोटिंग करण्याची मज्जा तुम्ही घेऊ शकता. येथे विविध प्रकारचे क्रूझ देखील उपलब्ध आहेत.
तिरुवनंतपुरम: तिरुवनंतपुरम किंवा त्रिवेंद्रम हे केरळची राजधानी आणि राज्यातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. हे त्याच्या मोहक समुद्रकिनाऱ्यांसाठी लोकप्रिय आहे. जगातील सर्वात श्रीमंतांपैकी एक मानले जाणारे प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिर हे देखील इथेच आहे.
त्रिशूर: हे शहर सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे, केरळमध्ये वापरल्या जाणार्या दागिन्यांपैकी सुमारे ७०% दागिने येथे उत्पादित केले जातात. चावक्कड बीच, नट्टिका बीच, वदनप्पल्ली बीच, स्नेहाथीराम बीच आणि पेरियाम्बलम बीच हे या ठिकाणचे स्वच्छ समुद्रकिनारे आहेत.