I.N.D.I.A: इंडिया आघाडीची 'एकजूट', बैठक सुरू होण्याआधी सर्व नेत्यांचं संयुक्त फोटोसेशन
आज सकाळी दुपारी 1 वाजता सर्व पक्षांची महत्त्वाची बैठक होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया बैठकीअगोदर ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांचं ग्रँड हयात हॉटेलमध्ये फोटोसेशन करण्यात आले आहे.
या बैठकीसाठी 28 पक्षांचे 63 प्रतिनिधी म्हणजे नेते मुंबईत उपस्थित आहेत.
या फोटोमध्ये मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आहेत.
युवा नेत्यांमध्ये राहुल गांधी, आपचे राघव चड्ढा, आदित्य ठाकरे, तेजस्वी यादव, अखिलेश यादव आहेत.
तर महिला नेत्यांमध्ये ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, सुप्रिया सुळे, मेहबुबा मुफ्ती आहेत.
या बैठकीत इंडिया आघाडीचा संयोजक ठरण्याची शक्यता आहे.
तसंच अध्यक्ष कोण असावा, आणि पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून कुणाला प्रोजेक्ट केलं जावं, यावरही चर्चा होईल.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या लोगोवर शिक्कामोर्तब होण्याची देखील अपेक्षा आहे.
गुरुवारी संध्याकाळी सर्व 28 पक्षांची अनौपचारिक बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या विशेष अधिवेशनावर चर्चा झाली.