In Pics : 'स्वदेशी आंदोलना'ची आठवण करुन देणारा National Handloom Day खास का आहे?
दरवर्षी देशात 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात येतो. 7 ऑगस्ट 1905 साली देशात स्वदेशी आंदोलन सुरु झालं होतं. कोलकात्यातील टाऊन हॉलच्या एका बैठकीत याची औपचारिक घोषणा करण्यात आली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 ऑगस्ट 2015 रोजी चेन्नईच्या कॉलेज ऑफ मद्रासच्या शताब्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला होता. त्यानंतर दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिन म्हणजे National Handloom Day साजरा करण्यात येतो.
भारतातील हातमाग व्यवसायाला प्राचीन परंपरा आहे. प्राचीन काळात भारतातून हातावर तयार केलेली रेशमी वस्त्रे सर्व जगभर निर्यात केली जायची.
हातमागाच्या माध्यमातून भारताची प्राचीन परंपरा, कौशल्य, संस्कृती आजही टिकवून ठेवली जात आहे.
हातमाग व्यवसायावर अनेक लोकांचे जीवन अवलंबून आहे. खासकरुन हातमाग व्यवसायात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. हातमागामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना रोजगार मिळतो. या घटकाच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये सुधार आणण्यासाठी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो.
वाढत्या कारखानदारीमुळे आणि स्पर्धेमुळे भारतातील हातमाग व्यवसाय सध्या अडचणीच्या गर्तेत सापडला आहे. त्यामुळे अनेक लोकांच्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याचं दिसून येतंय.
अलिकडे हातमाग व्यवसायात अनेक नामांकित ब्रॅन्ड्सनी प्रवेश केला असून त्यांनी हातमागाच्या कपड्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक रुप दिलं आहे.